रोहोकडी येथे नवरात्रोत्सवाची सुरुवात

रोहोकडी (जुन्नर) देशभरामध्ये आज घटस्थापनेच्या उस्तव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यातील रोहकडीमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये आज शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आदिशक्ती नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या घटस्थापनेच्या सोहळ्यामध्ये देवीच्या मुर्तीची भव्य मिरवणुक काढण्यात आली.

मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (ईंदुरीकर) यांचे समाजप्रबोधनपर किर्तण देखील आयोजित करण्यात आले होते. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुखांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

-Ads-

यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)