रॉजर फेडररचा उपांत्यफेरीत प्रवेश

मियामी – स्वीसचा अव्वल टेनिसपटू आणि 20 ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररने 1000 गुणांच्या मियामी ओपन एटीपी मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या केविन अँडरसनचा 6-0 आणि 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत उपांत्यफेरी गाठली.

हा सामना जिंकण्यासाठी फेडररने 85 मिनिटांचा वेळ घेतला. फेडररचा पुढील सामना कॅनडाच्या 19 वर्षीय डेनिस शापोव्हलोपशी होणार आहे. अन्य उपांत्यफेरीचा सामना जॉन इस्नर आणि कॅनडाच्या फेलिक्‍स अगर-आलुयास्मीशी यांच्यात रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)