दरडी कोसळल्यामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग ठप्प 

जम्मू: जम्मू – श्रीनगर महामार्गावर रामबन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आज पाच तास ठप्प झाली होती. काहीं प्रमाणात तेथील दरडी दूर करण्यात आल्यानंतर एकेरी वाहतुकीला हा मार्ग खुला करण्यात आला. जम्मू-श्रीनगर महामार्ग हा सर्व हवामानात सुरू राहील असा बनवण्यात आला आहे. पण तेथील दरडींच्या समस्यांमुळे वाहतूक कोडींची समस्या मात्र अजून काही सुटलेली नाही.

आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमाराला दिगडोले गावाजवळ हा दरडी कोसळण्याचा प्रकार घडला. हा महामार्ग चौपदरी करण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. दक्षिण काश्‍मीर मध्ये काल रात्री काही प्रमाणात बर्फवृष्टीही झाली. त्यामुळेही अनेक रस्त्यांवर वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)