रॉबर्ट वढेरा यांना 16 फेब्रुवारी पर्यंत अटकपूर्व जामीन मंजुर

नवी दिल्ली : मनि लॉंड्रिंगच्या प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांना येथील स्थानिक न्यायालयाने 16 फेब्रुवारीपर्यंत अटकपुर्व जामीन मिळाला आहे. लंडन येथील त्यांच्या एका मालमत्तेच्या संबंधातील हे प्रकरण असून त्या संबंधातील तपासासाठी आपले अशिल सक्त वसुली विभागाला पुर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही त्यांच्या वकिलांनी न्यायालयात आज दिल्यानंतर त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटक करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

1.9 दशलक्ष पौडांच्या या मालमत्तेच्या खरेदीत झालेल्या मनि लॉंड्रिंगच्या ईडीच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा रॉबर्ट यांच्यावतीने करण्यात आला असून निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप त्यांच्यावतीने करण्यात आला आहे. रॉबर्ट वढेरा हे कॉंग्रेसच्या नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोज अरोरा नावाच्या इसमामार्फत वढेरा यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याचा ईडीचा दावा असून अरोरा यांच्या विरोधातही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनाही न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. लंडनमधील ही मालमत्ता वढेरा यांच्याच व्यक्तीगत मालकीची असून ती मालमत्ता त्यांनी जाहीर केलेली नाही असे ईडीचे म्हणणे आहे. तसे म्हणणे त्यांनी आज कोर्टापुढे सादर केले.

या संबंधात पत्रकारांना माहिती देताना वढेरा यांच्या वकिल केटीएस तुलसी यांनी सांगितले की सन 2016 सालापासून वढेरा यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अटक करण्याचा किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण सरकारला आत्तापर्यंत त्यांच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. आता केवळ राजकीय सूडापोटी त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)