रॉबर्ट वढेरा ईडीपुढे हजर

स्वत: प्रियंकांनी त्यांना ईडीच्या कार्यालयात आणून सोडले

नवी दिल्ली : लंडनमध्ये मालमत्ता घेतल्याच्या कारणावरून सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते त्यानुसार आज रॉबर्ट वढेरा त्यांच्या पुढे चौकशीसाठी हजर राहिले. त्यांच्या पत्नी आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्वत: त्यांना ईडीच्या ऑफीसमध्ये सोडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईडी पुढे रॉबर्ट वढेरा उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या काही प्रकरणात त्यांना या चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहावे अशी सुचना त्यांना न्यायालयानेही केली होती. दरम्यान आपण कोणत्याही गैरव्यवहारात गुंतलेलो नाही आपल्यावर केवळ राजकीय द्वेषबुद्धीने हे आरोप करण्यात आले आहेत असा दावा रॉबर्ट वढेरांनी केला आहे.

वढेरा यांनी लंडन मध्ये काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत पण त्याची माहिती त्यांनी त्यांच्या मालमत्तेच्या यादीत दिलेली नाही. हा मनि लॉंड्रिंगचा प्रकार आहे असा आरोप ईडी म्हणजेच सक्त वसुली विभागाने केला आहे. लंडनच्या ब्रॅनस्टोन स्क्वेअर परिसरात वढेरा यांची सदनिका असून त्याची किंमत 1.9 दशलक्ष पौंड इतकी आहे असा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. वढेरा यांच्याशी संबंधीत असलेल्या स्कायलाईट हॉस्पीटॅलिटी एलएलपी या कंपनीशी संबंधीत असलेल्या मनोज अरोरा नावाच्या एका कर्मचाऱ्याचीही ईडीने चौकशी केली असून याच संबंधात ईडीने त्या कंपनीवर गेल्या डिसेंबर महिन्यात छापाही घातला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)