रोबोंचे उत्पादन आता रोबोच करणार 

स्टॉकहोम – एका रोबोने दुसरा रोबो तयार करण्याची करामत आता प्रत्यक्षात येत असून स्वीडनच्या स्विस इंजिनिअरिंग ग्रुप या कंपनीने चीनच्या शांघाय येथे यासाठी 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून कारखाना उभारला आहे.
या नव्या एबीबी कारखान्याचे काम 2020 सालात सुरू होईल आणि येथे तयार होणारे रोबो चीनसह आशियाई देशात निर्यात केले जातील.

अमेरिकेच्या नंतर चीन हा एबीबीचा दोन नंबरचा बाजार आहे. स्वीस कंपनीचे प्रमुख अलरीच स्पिशहॉपर म्हणाले, शांघाय हे एबीबी व जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. मजुरी महाग झाल्याने चीन रोबो निर्मितीवर अधिक भर देत असून 2017 मध्ये जगात विकल्या गेलेल्या दर तीन रोबो मागे एक चिनी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)