यापूर्वी 8 मे रोजी दिल्लीत नरेंद्र मोदी आणि प्रियांका गांधी वाड्रा प्रचार सभेसाठी आमने सामने आले होते.
वाराणसी – सध्या दिल्लीत २०१९ लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत शिगेला पोहचला आहे. काँग्रेस महासचिव ‘प्रियांका गांधी वाड्रा’ 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघात वाराणसीमध्ये रोड शो करणार आहे. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास प्रियांका गांधींचा रोड शो असणार आहे.
लंकाजवळील मालवीय स्टॅच्यू येथून रोड शोला सुरवात होणार असून, रविदास गेट, अस्सी, शिवाला, सोनारपुरा, मदनपुरा, गोदौलिया, बांसफाटकयाठिकाणाहून विश्वनाथ मंदिर जवळ संपन्न होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला निवडुकीचा अर्ज दाखल करताना वाराणसी मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते. त्यामुळे आता, वाराणसीत प्रियांका गांधींच्या रोड शोचा किती प्रभाव मोदींच्या मतांवर पडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.