‘संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दोन तास भाषण देऊनही दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही’

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत शुक्रवारी दोन तास भाषण केले. परंतु, दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, अशा शब्दात राहुल गांधींनी टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचा एक छोटा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत म्हणाले कि, लोकसभेत संरक्षणमंत्र्यांनी दोन तास भाषण केले. परंतु, माझ्या दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. हा व्हिडीओ पाहा आणि शेअर करा. हे प्रश्न प्रत्येक भारतीयांनी आपल्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना विचारायला हवे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, हिंदुस्थान एरॉनटिक्सकडून हे कंत्राट काढून अनिल अंबानी यांना कोणी दिले? नवीन करारासंबंधी संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आक्षेप आहे का? असे प्रश्न राहुल गांधींनी निर्मला सीतारामन यांना विचारले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)