नदीपात्रात प्रत्येक 20 मीटरवर धूळ मोजणी यंत्रणा

तज्ज्ञ समितीची शिफारस, सांडपाणीही शुद्धीकरणाचीही अट

पुणे – नदीपात्रात मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान महामेट्रोने प्रत्येक 20 मीटर अंतरावर धूळ मोजणी यंत्रणा (डस्ट सेन्सर्स) उभारण्याच्या सूचना पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने केल्या आहेत. याशिवाय, या 1.4 किलोमीटरच्या मार्गातील झाडांचे पुनर्रोपण घनकचरा आणि मैलापाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया, मेट्रो स्टेशनसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था उभारणे अशा प्रकारच्या कडक शिफारशी या समितीने सूचविलेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तज्ज्ञ समितीच्या शिफारशी पाळण्याच्या अटींवरच राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटीने) महामेट्रोच्या नदीपात्रातील बांधकामाला हिरवा कंदील दर्शविला आहे. यावरील याचिकेचा निकाल मेट्रोच्या बाजूने देताना, या कामासाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. महामेट्रो आणि पुणे महापालिकेने संयुक्तरित्या त्याची अंमलबजावणी करावी, असेही समितीने स्पष्ट केले आहे. मेट्रोच्या बांधकामादरम्यान या शिफारसींची अंमलबजावणीवर संबंधित समितीकडूनच लक्ष ठेवले जाणार आहे.

या आहेत प्रमुख शिफारशी
– 32 झाडांचे नुकसान होणार असल्याने त्याबदल्यात 96 झाडे लावा.
– बांधकामादरम्यान सूक्ष्म धुलिकणांची मर्यादा तपासण्यासाठी नदीपात्रामध्ये दर 20 मीटरवर “डस्ट सेन्सर्स’ लावणे.
– दिलेल्या सूचनांनुसार काम होते की नाही, याची तपासणी प्रत्येक दोन महिन्यांनी करणे.
– जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि खांबांची उभारणी करताना निघालेल्या मातीची योग्य विल्हेवाट लावणे.
– मेट्रो स्थानक परिसरात सांडपाणी शुद्धीकरण, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे.
– स्थानकासाठी पुरेशी पार्किंगची जागा द्यावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)