विमानतळावरील व्यवस्थापकांवर रितेशने व्यक्त केला संताप

हैद्राबाद- बॉलिवूड अभिनेता ‘रितेश देशमुख’ नेहमीच आपल्या सोशल मीडिया आकाउंटवरून एकामागोमाग एक व्हिडीओ शेअर करत असतो. पुन्हा एकदा रितेशने आपल्या ट्विटर अकाउंटवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये विमानतळावरील प्रवासी अत्यंत अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यातील पहिल्या व्हिडिओमध्ये विमातळाच्या लाऊंजचा भाग दिसून येत आहे. जेथे प्रवासी बाहेर जाण्यासाठीचा रस्ता साखळीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या विमानतळावरील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. एकंदर ही सर्व परिस्थिती पाहता रितेशने अचानक इथे आग लागली तर, एकाधी मोठी दुर्घटना होऊ शकते.. असे उपरोधिक विधान केले आहे.

तर, यातील दुसऱ्या व्हिडीओमध्ये असे दिसते कि, प्रवाशांनी वारंवार विनवणी करुनही सुरक्षा रक्षक आपातकालीन दरवाज उघडण्यास नकार देत आहेत. रितेशचे हे ट्विट पाहून लगेचच हैदराबाद विमानतळ व्यवस्थापनाकडून याची दखल घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)