ऋृषीकुमार शुक्‍ला यांनी सीबीआय प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली : नवनियुक्त सीबीआय प्रमुख ऋृषीकुमार शुक्‍ला यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कोलकाता येथे सीबीआय आणि पोलिस यांच्यातील संघर्षांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा कार्यभार स्वीकारला आहे. 58 वर्षीय शुक्‍ला हे मध्यप्रदेशचे माजी पोलिस महासंचालक आहेत. सीबीआयमध्ये सध्या अंतर्गत दुफळीही माजली असून त्यातून अनेक कोर्ट केसेसही उद्‌भवल्या आहेत. त्यामुळे या संस्थेची विश्‍वासार्हता आणि अंतर्गत स्थिती नीट करण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागणार आहे.

सीबीआय प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सर्वात प्रथम कोलकात्यातील प्रकरणात लक्ष घालावे लागणार आहे. सध्या सीबीआयला पश्‍चिम बंगाल मध्ये प्रवेशालाही अनुमती तेथील सरकारने नाकारली असून सॉल्ट लेक सिटीतील सीजीओ संकुलातील सीबीआयच्या कार्यालयालाही पोलिसांनी घरले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तेथील श्रद्धा आणि रोझ व्हॅली चिटफंड कंपन्यांच्या गैरव्यवहारांचा विषयही त्यांना हाताळावा लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)