कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस तयार – ऋषभ पंत

संग्रहित छायाचित्र..

मुंबई  – भारताचा नवोदिता यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मुंबई इंडियन्स विरुद्ध तडाखेबाज खेळी करत केवळ 37 चेंडूत 78 धावा चोपत दिल्लीला दोनशे धावांच्या पार पोहोचवले. याखेळी नंतर बोलताना ऋषभ म्हणाला की, संघाच्या गरजेनुसार मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली याचा मला आनंद आहे.

सामन्यातील कामगिरीबाबत बोलताना तो म्हणाला की, ज्यावेळी तुम्ही चांगला खेळ करता आणि त्यामुळे तुमचा संघ जिंकतो तेंव्हा तुम्हाला सर्वात जास्त आनंद होत असतो. तसाच आनंद मला आजच्या सामन्यातील खेळीनंतर होत आहे. मी संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करण्यावर भर देतो. त्यामुळे आज मला जी जबाबदारी सोपवली होती ती मी यशस्वीपणे पार पाडली याचा मला जास्त आनंद आहे.

आजच्या सामन्यात मला संघाच्या धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार मी आल्या पासून मोठे फटके खेळण्यावर भर दिला आणि त्याचा मला फायदा झाला. असेही पंतने यावेळी सांगितले.

मुंबईने 14व्या षटकापर्यंत सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. मात्र, त्यानंतर ऋषभने इतर फलंदाजांना साथित घेत फटकेबाजी करत अखेरच्या सहा षटकांमधे तब्बल 99 धावा जमविल्याने दिल्लीने सामन्यात पुनरागमन करत 213 धावांची मजल मारली. यावेळी ऋषभने आपल्या खेळीत सात उत्तुंग षटकार खेचले ज्यात दोन षटकार त्याने जसप्रीत बुमराहला खेचले.

यावेळी त्याने अनेक नविन फटके खेळत मुंबईच्या गोलंदाजांना नमोहराम करुण सोडले ज्यात त्याने धोनी प्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळला होता तर युवराज सिंग प्रमाणे एका हाताने षटकार खेचत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला. या विषयी बोलताना पंत म्हणाला की, क्रिकेटच्या या प्रकारात सर्वच चांगले खेळाडू असतात त्यात मुंबईच्या संघाकडे एका पेक्षा एक चांगले गोलंदाज होते. ते तुम्हाला फटके खेळण्याची संधी देत नव्हते त्यामुळे नव नविन फटके खेळावे लागतात. अशाच प्रकारच्या फटक्‍यांचा मी सराव केला होता. ज्याचा फायदा मला मुंबई विरुद्धच्या सामन्यात झाला असेही त्याने यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)