#आगळे वेगळे: अधिकार बसण्याचा (भाग १)

अनुराधा पवार
बसून बसून कंटाळा आला बाई, असे उद्‌गार आपण नेहमी ऐकतो. आपण स्वत: असे अनेक वेळा म्हणतो. घरीही असे म्हणण्याची कधी कधी येते, विशेषत: पापड वगैरेचा कार्यक्रम असतो, तेव्हा तर बायका कंटाळा आला बसून बसून असे म्हणून पाय मोकळे करतात. ऑफिसातही खूप वेळ खुर्चीत बसल्यावर कंटाळा येतो आणि मग काही निमित्ताने खुर्ची सोडून पाय मोकळे करण्यासाठी काही निमित्ताने बाहेर पडणे होते. मग कधी ते चहासाठी असते, तर कधी फ्रेश होण्यासाठी असते. पण बसून बसून कंटाळा येतो हे खरे. बसून जसा कंटाळा येतो, तसा उभे राहूनही कंटाळा येतो. माणसाला कोणतीही एक स्थिती फार काळ आवडत नाही, सहन होत नाही. हा तर सर्वांचाच अनुभव.
कामासाठी जर तासनतास बसून राहावे लागले वा उभे राहावे लागले तर कंटाळा येणे अगदी साहजिकच आहे. पण असा कंटाळा आला की आपण त्यात बदल करतो. म्हणजे फार काळ बसून राहिलेलो असलो तर मग उभे राहतो, चार पावले फिरून येतो. आणि फार काळ उभे असतो तर कधी एकदा बसू असे होते आपल्याला, पण असे बसण्यासाठी वा बसलेलो असलो तर उभे राहण्यासाठी आपल्याला कोणाची परवानगी घेण्याची गरज पडत नाही. अगदी कामाच्या ठिकाणीही नाही. तास दोन तासांनी आपण जागा सोडतो. अगदी काही क्षणासाठी का होईना, पण जागेवरून उठतो. तेवढेच बरे वाटते.
पण आठ दहा तासांची ड्यूटी आहे, आणि त्या काळात अजिबात बसायचे नाही, वा विश्रांतीसाठी म्हणून भिंतीला वा टेबलाला टेकायचेही नाही अशी कडक शिस्त असेल, तर मग कंटाळा येणे अगदी साहजिक आहे. बऱ्याच शॉपमधील सेल्स गर्ल्सना सतत उभे राहावे लागते. पण त्यांनाही क्षणभर विसावा घेण्याची, चहापाणी घेण्याची, वॉशरूमला जाण्याची मुभा असते.
केरळमधील सेल्स गर्ल्सना मात्र आपल्या बसण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला आहे. गेल्या आठवड्यातच त्याबद्दल मी वाचले. ही गोष्ट सुरू होते मायादेवीपासून. एका टेक्‍स्टाईल शॉपमध्ये ती काम करत होती. कस्टमर्सना आवडलेली वस्त्रे-साड्या आदी काढून दाखवणे हे तिचे काम. मात्र कामावर असताना तिला कधीही बसण्याची मुभा नव्हती. अगदी शॉपमध्ये एकही कस्टमर नसला, तरी तिने आणि अन्य सेल्सगर्ल्सनीही उभेच राहिले पाहिजे असा दंडक होता.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)