सासू सासऱ्यांचा त्रासाने विभक्‍त पत्नीला पोटगीचा अधिकार (भाग-२)

सासू सासऱ्यांचा त्रासाने विभक्‍त पत्नीला पोटगीचा अधिकार (भाग-१)

माझा पती चांगला आहे, आम्ही दोघे व्यवस्थित संसार करतो, मात्र सासूने कान भरवले की पती मारहाण करतो अशी तक्रार आजकाल बहुतांश ठिकाणी ऐकायला मिळते. अशा कात्रीत सापडलेल्या महिलाना दिलासा देणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला आहे. शेख बसीद विरुद्ध महाराष्ट्र सरकार व यास्मीनबानो या खटल्यात न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने 6 फेब्रुवारी 2019 ला हा वेगळा असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सदर याचिकेतील अपीलकर्त्या पतीने सन 2004 साली माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीविरुद्ध नांदायला येण्यासाठी कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला होता व पत्नीने फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कलम 125 नुसार पोटगीचा अर्ज दाखल केला होता. अर्जदार पतीच्या म्हणण्यानुसार त्यांचे लग्न 2002 साली झाले, त्यानंतर पत्त्नी माझ्या सोबत फक्‍त पाच सहा महिने राहीली. ती नियमित भांडणे करुन घरी जात ती नियमित माझे भाऊ, बहीण, आई वडील यांचेशी भांडणे करायची तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती समजून घेत नव्हती. ती खऱ्या अर्थाने माझेकडे फक्त 15/20 दिवसच राहिली. त्यानंतर ती सन 2004 साली माहेरी निघून गेली. त्यानंतर मध्यस्थामार्फत प्रयत्न करुनही ती माहेरी आली नाही. म्हणून न्यायालयामार्फत नांदावयास येण्याचा दावा केला आहे अशी बाजू मांडणेत आली.

त्यावर पत्नीने मी पतीबरोबर दीड वर्ष रहिले मात्र माहेरहुन दहा हजार रुपये आणण्यासाठी माझा सासरच्या लोकाकडून छळ केला गेला. त्यानंतर सात महिन्यापुर्वी सासुच्या सांगण्यावरून पतीने घरातून हाकलून दिले जर माझा पती मला चांगले वागवण्याची हमी देत असेल तर मी आज ही पती बरोबर राहण्यास तयार आहे. मात्र, मी सासू सासरे त्रास देत असल्याने वेगळे राहिले तरच मला संसार करणे शक्‍य आहे. अन्यथा माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. माझा पती कमावता असून मला मासिक 1500/- दीड हजार रुपये पोटगी देण्यात यावी, अशी मागणी केली तो प्रतिदीन 250 रुपये कमवित असल्याचे तीने सांगितले व त्याचे भाऊ व वडील कमवते असल्याने त्याच्यावर कुटुंबाचीपण जबाबदारी नसल्याचे सांगितले. त्यावर पतीने आपण फक्‍त 50 रुपये कमवित आहोत असे सांगितले. त्यावर कुटुंब न्यायालयाने पतीचा वैवाहीक संबध पुनर्स्थापनेचा अर्ज नामंजुर करीत पत्नीला 700/- रुपये दरमहा पोटगी मंजुर केली.

त्यावर पतीने उच्च न्यायालयात अपीलात पत्नीने पती चांगला आहे, असे सांगितले आहे, त्यामुळे वयस्कर आई वडीलाना सोडून पती वेगळा राहु शकत नाही. कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द करुन पतीचा वैवाहीक सबंध पुनर्स्थापनेचा अर्ज मंजूर व्हावा म्हणुन मागणी केली.

उच्च न्यायालयाने सरकार पक्षाची बाजु ऐकून न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने विश्‍लेषण करीत पती पत्नी कोणत्याही कारणाशिवाय माहेरी राहत आहे हे सिद्ध करु शकला नाही, असे सांगत आपल्या समाजात सतत पुरुषांच्याच मतांचा विचार केला जातो बदलत्या परिस्थीतीत पत्नीच्या ही ईच्छा चा विचार केला पाहीजे जर पत्नी सासरच्या मंडळीच्या त्रासात समाधानाने जिवन जगू शकत नसेल तर ती पती बरोबर स्वतंत्र राहु शकते व ती पोटगीस पात्र ठरु शकते, असे मत व्यक्त करीत कुटुंब न्यायालयाने मंजूर केलेली पोटगीची रक्‍कम योग्य असून पतीचे अपील फेटाळले आहे.

आई वडीलाना न सांभाळल्यास पती घटस्फोट घेवु शकतो, असाही निकाल पूर्वी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नी विभक्त असताना ती पतीबरोबर वेगळी राहण्यास तयार असेल तर पोटगीस पात्र ठरू शकते. असा वेगळा व महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने खरोखर सासरच्या मंडळीकडून त्रास होत असलेल्या महिलाना मात्र या निकालाने दिलासा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)