नवी दिल्ली – गुजरातमधील अहमदाबादमध्ये राईड तुटून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अहमदाबादमधील कांकरिया अॅम्यूजमेंट पार्कमध्ये ही दुर्घटना घडली आहे. राईड सुरु असताना पोलमधील वेल्डिंग तुटल्याने अचानक राईड खाली कोसळली. यामध्ये ३० जण या राईडमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. राईडच्या क्षमतेपेक्षा अधिक जण बसवल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच या राईडच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याचा आरोपही केला जात आहे.
Ahmedabad: 2 people died&26 injured after a joyride at an adventure park in Kankaria area broke this afternoon. Vijay Nehra,Commissioner, Municipal Corporation says,”Police along with the FSL team is investigating the matter.Proper treatment is being given to injured.” #Gujarat pic.twitter.com/YmV1qS9w2F
— ANI (@ANI) July 14, 2019