रिचा चढ्ढा ‘शकिला’च्या बायोपिकमध्ये

“मसान’, “फुकरे’ सारख्या हिट चित्रपटात काम केल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आता दाक्षिणात्य सेक्स बॉम्ब अभिनेत्री शकिलाच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. चित्रपटात शकिलाची भूमिका रिचा चढ्ढा साकारणार असून नुकताच चित्रपटातील तिचा शकिलाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. रिचा या लूकमध्ये साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बोल्ड चित्रपटांमध्ये शकिला काम करते. ती मूळची मल्याळम अभिनेत्री असून आपल्या बोल्ड आणि सेक्सी सीन्समुळे शकिला ही लोकप्रिय ठरली. तिने वयाच्या 16 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि लोकांना अक्षरशः वेडे केले. 90 च्या दशकात तिच्या चित्रपटांनी दक्षिणेत धुमाकूळ घातला. मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलगु भाषेत तिचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शकिलाच्या बायोपिकच्या शूटिंगला ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे. विद्या बालनद्वारे डर्टी पिक्चचरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका यशस्वीपणे साकारण्यात आल्यानंतर बॉलीवूडमध्ये ही भूमिका अत्यंत खास मानली गेली. सिल्कच्या अगदी उलट शकिलाचे नाव दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय होते व तिचे यश अभिनेत्यांइतकेच होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींना शकिला खानची भूमिका साकारायची होती. काही अभिनेत्रींनी तर साऊथमध्ये जाऊन फिल्ममेकर्सची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. हुमा कुरेशी व स्वरा भास्करसारख्या अभिनेत्रीही या शर्यतीत होत्या, परंतु अखेरीस मसानच्या या अभिनेत्रीने बाजी मारली.

त्याशिवाय गंमतीची आणखी एक गोष्ट आहे. 2-4 महिन्यांपूर्वी रिचा चढ्ढाने आपला एक मजेदार व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये ती टूथपेस्टने दात घासताना दिसत होती. “फुकरे’मध्ये तिचा असाच ब्रश करतानाचा सीन होता. त्याची आठवण म्हणून तिने हा व्हिडीओ अपलोड केला. पण ट्रोलर्सनी तिच्यावर जोरदार टीका केली होती. तिच्यावर केलेल्या टीकेला रिचाने जोरदार उत्तरही दिले आहे. “तुम्ही कदाचित ब्रश करतच नसाल. रात्री खाल्लेले खाणे वाया जायला नको, म्हणून तुम्ही कदाचित स्वतःच्या तोंडात उलटी करत असाल.’ असे तिने ट्रोलर्सना सुनावले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)