संधिवात उपचार चतुःसूत्री 

दात, हिरड्यातील जंतुसंसर्ग चिकित्सा महत्वाची 
शरीरात कोठेही जंतुसंसर्ग असेल तर त्याची प्रथम चिकित्सा करावी. विशेषतः दात, हिरड्या यामध्ये बहुतेक लोकांना तसेच वृद्धांना जंतुसंसर्ग असतो. संधिवात असणाऱ्यांनी अशाप्रकारचा शरीरात कोठे आजार असेल तर प्रथम त्याची चिकित्सा करून घेतली तर सांध्याच्या विकारांची बहुतांशी शक्‍यता कमी होते.

आहार  
आहारात विशेषतः कच्चा भाजीपाला ठेवणे आवश्‍यक आहे. कोणतेही चरबीयुक्‍त पदार्थ उच्चप्रोटीन युक्‍त आहार टाळला पाहिजे. आहारात विशेषतः ताज्या फळांचा रस, ताज्या भाजीचे सूप किंवा रस, कच्ची भाजी, कोशिंबीर, कोबी, लसूण, लिंबू आदी पदार्थ तसेच तेल, आदींचा वापर योग्य ठरतो. तसेच अशा लोकांनी मांस, मासे, दुधाचे पदार्थ, अंडी, अति खारट पदार्थ, कॉफी, चहा, तंबाखू आदीचा वापर टाळावयास हवा. संधीवाताच्या आजारात आहाराबाबतीत अधिक जागृक असावे. सांध्याच्या आजारातील इतर चिकित्सापेक्षा आहारापथ्ये पाळली तर बरा होण्याचे प्रमाण निश्‍चित चांगले असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाह्य चिकित्सा 
यामध्ये फिजिओथेरेपी, पंचकर्म गरम पाण्याने शेक, स्नेहन, मॉलिश, स्वेदन वाफेद्वारे, लेप, टबबाथ, उष्णवालुकास्वेद, पोटली शेक असा प्रयोग योग्य ठरतो. योग्य आसने, व्यायाम, मोकळ्या हवेत फिरणे, सूर्यस्नान आदींचाही लाभ सांधेदुखीत होतो.

बस्तीचिकित्सा 
आयुर्वेदात अशा प्रकारच्या विकारासाठी बस्ती अर्थात औषधीयुक्‍त काढ्यांचा एनिमा अशी चिकित्सा सांगितली आहे. सुरूवातीस सांगितल्याप्रमाणे आतड्याचे अस्तर कमजोर झाल्यामुळे निर्माण होणारे टॉक्‍सीन सांध्याच्या स्नायुंमध्ये विकृती निर्माण करतात. या चिकित्सेने यातील औषधी काढ्यांनी दिलेल्या एनिमांमुळे आतड्यांच्या अस्तरास मजबुती मिळते. ही बस्ती म्हणजे सोपवॉटर एनिमासारखे मलाशय धुणारी पद्धती नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)