#चिंतन :  एक आठवण-चिपळूणकर साहेबांची (भाग 1)

-डाॅ. दिलीप गरूड

दिंनाक 18 सप्टेंबर 2018 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर साहेब यांचे निधन झाले. बातमीने माझ्या मनात त्यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

-Ads-

चिपळूणकर साहेब 1976 ते 1986 अशी दहा वर्षे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक होते. त्यांच्या सेवेची सुरुवात शिक्षक म्हणून झाली होती. 89 वर्षांचे आयुष्य त्यांना मिळालेल्या त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सदा प्रसन्नता असे.

1983 सालची गोष्ट आहे. मी येरवड्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मी आणि शाळेतील एक शिक्षिका मंगला कामत यांनी मिळून मुलांची व्यक्तिचित्रणे लिहिली. कामतबाईंनी नऊ व मी आठ अशी एकूण सतरा व्यक्तिचित्रणे लिहिली. त्याचे पुस्तक काढायचे ठरवले. खर्च आमचा आम्हीच करणार होतो. आम्हाला एका ज्येष्ठ शिक्षकाने सल्ला दिला की, तुम्ही वि. वि. चिपळूणकर साहेबांची प्रस्तावना या पुस्तकाला घ्या.

एके दिवशी मी चिपळूणकर साहेबांच्या भेटीला गेलो. मनात धाकधूक होत होती. कारण शिक्षणक्षेत्रात मी नवखा होतो आणि एवढ्या ज्ञानी माणसाला भेटायला निघालो होतो. मन म्हणत होते. ते आपल्याला भेट देतील का? मनमोकळं बोलतील का? त्यांना संपूर्ण राज्याचा कारभार पाहायचाय, मग त्यांना हे पुस्तक आवडेल का? वाचून प्रस्तावना लिहायला वेळ मिळेल का?अशा नाना शंका घेऊन मी पुणे स्टेशन जवळच्या सेंट्रल बिल्डिंगमधल्या त्यांच्या कार्यालयात गेलो. तेथे त्यांच्या कार्यालयाबाहेरच्या सेवकाला म्हटले. “”साहेब आहेत का? मला त्यांना भेटायचंय.” “”काय काम आहे?”

“”माझ्या पुस्तकाला प्रस्तावना घ्यायचीय. मग सेवकाने दिलेल्या चिठ्ठीवर माझे नाव, शाळा, दिनांक, भेटीचे कारण लिहिले. चिठ्ठी आत गेली. लगेच आत बोलवल्याचा निरोप आला. प्रसन्न चेहऱ्याने, स्मितहास्य करत साहेबांनी स्वागत केले. समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मी माझे नाव, शाळा, भेटीचे कारण सांगितले. त्यावर ते म्हणाले,””पुस्तक घेऊन आलात का?”””हो.”मी त्यांच्या हातात ते मुखपृष्ठ नसलेले पुस्तक दिले. त्यांनी ते चाळले. मग मला म्हणाले,

“”तुम्हाला किती दिवसांत प्रस्तावना हवी?” खरं म्हणजे मला लवकरात लवकर प्रस्तावना हवी होती. प्रस्तावनेमुळे काम अपूर्ण होते. पण साहेबांना वाचायला. वेळ तर द्यायला हवा. म्हणून मी म्हणालो, “”पंधरा दिवसांत दिली तरी चालेल.”
“”ठीक आहे. देतो.” ते आश्‍वासकपणे म्हणाले. माझ्या मनावरचा ताण कमी झाला. नमस्कार करून मी कार्यालयाबाहेर पडलो.

नंतर वीस दिवसांनी प्रस्तावना आणायला गेलो, साहेब दौऱ्यावर होते. मात्र, तेथील सेवक म्हणाला,

#चिंतन :  एक आठवण-चिपळूणकर साहेबांची (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)