#चिंतन :  एक आठवण-चिपळूणकर साहेबांची (भाग 2)

-डाॅ. दिलीप गरूड

#चिंतन :  एक आठवण-चिपळूणकर साहेबांची (भाग 1)

-Ads-

दिंनाक 18 सप्टेंबर 2018 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर साहेब यांचे निधन झाले. बातमीने माझ्या मनात त्यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

“”तुमच्या पुस्तकाची प्रस्तावना तयार आहे. दहा दिवसांपूर्वीच लिहून झालीय.”असं म्हणून त्याने एक मोठा लिफाफा माझ्या हाती ठेवला. त्यात “सोबत पुस्तकाची ‘पुस्तक देखणी सही करून ठेवले होते. मी आश्‍चर्यचकित झालो. एवढा कामाचा व्याप असताना, माझ्यासारख्या नवख्या, धडपडणाऱ्या शिक्षकाच्या पुस्तकाला त्यांनी सुंदर प्रस्तावना दिली होती. त्या आमच्या पुस्तकाचे शीर्षक होते “अंकुरणारी मने’. ते आमचे पहिले पुस्तक!

साहित्य क्षेत्रात आम्ही टाकलेले पहिले पाऊल आणि त्या धडपडीला चिपळूणकर साहेबांनी प्रस्तावनेच्या रूपाने प्रोत्साहन दिले. माझा ऊर भरून आला. उत्साह दुणावला.

एकदा आमच्या नेताजी हायस्कूलमध्ये मुलांशी बोलायला आले. आम्ही शाळेच्या हॉलमध्ये मुले बसवून घेतली होती. भिंतींच्या कडेने खुर्च्या लावून त्यावर शिक्षक बसले होते. चिपळूणकर साहेब येणार म्हणून आमच्या मनात आनंद होता. तसा मनावर ताणही होता. कारण मुले शांत बसतील की नाही, अशी मनात शंका होती. मुले आपापसात बोलत होती. ती शांत बसावीत म्हणून एक शिक्षिका हातात छडी घेऊन त्या मुलांना दटावत होत्या.

फलक लेखन सुंदर केले होते. हॉलची सजावटही छान केली होती. सूत्रसंचालन करणारे शिक्षक सज्ज होते. शाळेच्या दरवाजात रांगोळी रेखली होते. स्वागताची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तयार होते. तेवढ्यात चिपळूणकर साहेब मुख्याध्यापकांसोबत हॉलमध्ये आले. ते खुर्चीवर स्थानापन्न झाले. तरी मुले बडबडत होती. बाई त्यांच्यावर डोळे वटारून, छडी दाखवून दटावत होत्या. तेवढ्यात चिपळूणकर साहेब उठले. ते बाईंना नम्रपणे म्हणाले.

“”बाई, तुम्ही बसा आता. मी मुलांशी बोलतो.” ते माईकसमोर उभे राहिले. त्यांचे प्रसन्न व्यक्‍तिमत्त्व पाहून मुले शांत झाली. ते आईच्या मायेने मुलांशी बोलले. जणू साने गुरुजी मुलांशी संवाद साधत आहेत. साहेब तासभर बोलले. मुलांनी, शिक्षकांनी तासभर त्यांचे भाषण ऐकून घेतले.

“या हृदयीचे ते हृदयी’ असा तो संवाद होता. छडीचा वापर न करता मुलं शांत कशी करता येतात, याचा तो वस्तुपाठ होता. आपल्या भाषणात चिपळूणकर साहेब एक महत्त्वाचं वाक्‍य बोलून गेले. ते वाक्‍य माझ्या कायमचं स्मरणात आहे. – “”शिक्षण हे दळण नसून वळण आहे.”

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)