निवडणुक आयुक्तांनी गोव्यात घेतला लोकसभा तयारीचा आढावा

पणजी: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज गोव्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील तयारीचा आढावा घेतला. लवासा यांनी पत्रकारांना सांगितले की लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू असून त्या कामाच्या प्रगतीसह निवडणुकीच्या तयारी संबंधात आम्ही आज येथील बैठकीत आढावा घेतला.

गोव्यातील मुख्य निवडणूक आधिकारी आणि त्यांचे सहकारी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्रमानुसार कालबद्ध काम करीत आहेत. येथील नियोजित कार्यक्रमानुसार येत्या 4 जानेवारीला मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील असे ते म्हणाले. शिरोडा आणि मंद्रेम विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा विषय आजच्या आढावा बैठकीत समाविष्ठ नव्हता असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. आजची ही बैठक केवळ लोकसभेच्या आढाव्यासाठी होती त्यात विधानसभा पोटनिवडणुकीचा विषयच नव्हता असे ते म्हणाले. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत आणि या दोन्ही जागा भाजपकडे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)