महसूलचे दीड कोटी, तर पोलिसांचे 84 लाख

स्वस्ती फायनान्सची रक्कम प्राप्तिकर विभागाकडून सील : दीड कोटीची रक्कम निघाली जिल्हा बॅंकेची

50 हजार रोकडची देखील चौकशी

सरकारी किंवा खासगी बॅंकेतून 50 हजारांच्या रोकड काढली आणि ती आचारसंहिता पथकाने पकडल्यात त्याची चौकशी होणार आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे देता न आल्यास आणि कागदपत्रांची पुर्तता करण्यास न जमल्यास कारवाई होणार आहे. जिल्हा निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेल्या प्रत्येक यंत्रणेला यासंदर्भात कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

नगर – जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता पथकाने नेप्ती नाका येथे दीड कोटी, तर शहर पोलिसांनी वैदूवाडी येथे 84 लाख रुपयांची रक्कम पकडली. दोन्ही विभागाच्या या कारवायांमध्ये हाती काहीच लागले नाही. मात्र, या कारवायांची शहरात दिवसभर चर्चा रंगली झाली. आचारसंहिता पथकाने पकडलेल्या रोकडेवर महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विसंगत माहिती देण्यात येत होती. त्यामुळे या कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आचारसंहिता पथक दक्ष झाली आहेत. नेवासे येथे पथकाने शुक्रवारी सुगंधी तंबाखू पकडून दिली. यानंतर पथकाने आज शहरात नेप्ती नाका येथे 1 कोटी 55 लाखांची रोकड घेऊन चालेल्या वाहनाला पकडले. या रकमेची योग्य ती माहिती देता न आल्याने पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून रोकडची तपासणी करून घेतली. ही रोकड जिल्हा सहकारी बॅंकेची असल्याचे समोर आले. रोकड जिल्हा बॅंकेचीच होती का आणि तो योग्य ठिकाणी जात होती का, याची सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशी करत होती. त्यात बऱ्यापैकी तथ्य आढळून आल्याचे समोर आले.

दरम्यान, या रोकडविषयी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी माहिती दिली. “रोकडची तपासणी सुरू आहे. ही जिल्हा बॅंकेचीच रोकड असल्याचे समोर येत आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या रोकडची तपासणी करत आहेत. कागदपत्रांची तपासणी होत आहे. उद्या रविवारपर्यंत रोकडेची चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी सांगितले.’ प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी मात्र ही रोकड जिल्हा बॅंकेची असल्याचे स्पष्ट केले.

महसुलची ही कारवाई दुपारपर्यंत सुरू असतानाच शहर पोलिसांनी वैदूवाडी येथील एका खासगी फायनान्स कंपनीवर छापा घातला. शहर पोलिसांनी या कंपनीच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक एच. मुलाणी यांनी सहकाऱ्यांसह तिथे छापा घातला. या कंपनीच्या कार्यालयात सुमारे 84 लाखांची रोकड होती. ही रोकड कोठून आणि कशी आली याची रात्रीउशिरापर्यंत पोलीस यंत्रणा खात्री करून घेत होते. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही रोकड बचत गटांच्या महिलांकडून मार्च अखेर असल्याने जमा केल्याची स्पष्टीकरण दिले. या रोकडची तपासणीत फायनान्स कंपनीच्या कथनात बरेच तथ्य आढळले.

महसूल आणि पोलीस यंत्रणेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच वेळी शहरात रोकड संदर्भात कारवाई केल्याने चर्चेचा उधाण आले होते. महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या या कारवायांमध्ये तथ्या काहीच आढळले नसले, तरी एक चांगली वातावरण निर्मिती झाली आहे.

स्वस्ती कंपनी फायनान्सच्या नगर शाखेतील शहर पोलिसानी केलेल्या कारवाईत 84 लाख रुपये सापडले आहेत. या रकमेच्या चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाच्या सहा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशीत संबंधित फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आलेली नाहीत. त्यामुळे ही रक्कम सील करून प्राप्तिकर अधिकारी ताब्यात घेत आहे. यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल.

संदीप मिटके ,शहर पोलीस उपअधीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)