आशावाद परतल्याने शेअर निर्देशांक वाढले

पतधोरणातील व्याजदर वाढीचा परिणाम झाला समाप्त

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर भांडवल बाजारात निर्माण झालेला नकारात्मक परिणाम दोन दिवसांतच समाप्त झाला आहे. आज शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दोन दिवसांत झालेली झिज भरून निघाली आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्या आठवड्यात निर्देशांक वाढले आहेत.

-Ads-

आज सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर पुढील दोन महिन्यात पाऊस समाधानकारक पडण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे शेअरबाजारात खरेदीचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. गेल्या दोन दिवसांत व्याजदराशी संबंधित कंपन्याचे शेअर जरा जास्त प्रमाणात घसरले होते. त्यामुळे त्यांचे मूल्य बऱ्याच गुंतवणूकदारांना आकर्षक वाटल्यामुळे त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची आज तुलनेने जास्त खरेदी झाल्याचे आढळून आले.

शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 391 अंकांनी म्हणजे 1.05 टक्‍क्‍यांनी वाढून 37556 अंकांवर बंद झाला. पतधोरणानंतर गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्‍स 441 अंकानी कमी झाला होता. आज विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 116 अंकानी म्हणजे 1.03 टक्‍क्‍यांनी उसळून 11360 अंकावर बंद झाला. मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 1.16 टक्‍क्‍यानी अंकानी तर मिड कॅप 0.93 टक्‍क्‍यानी वाढल्याचे
दिसून आले.

सरलेल्या आठवड्यातही सेन्सेक्‍स 219 अंकानी म्हणे 0.59 टक्‍क्‍यांनी तर निफ्टी 82 अंकानी म्हणजे0.73 टक्‍क्‍यानी वाढला. सेवा क्षेत्राचा
निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर शेअरबाजारातील नकारात्मक वातावरण निवळल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अमेरिका आणि जपानचे पतधोरण फारसे नकारात्मक नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. मात्र तरीही अमेरिका- चीनदरम्यनाचे व्यापारयुद्ध कोणते वळण घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

कालच्या विक्रीच्या माऱ्यात देशातील आणि परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी हात धुऊन घेतले असल्याची आकडेवारी आज समोर आली आहे. काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 639 कोटी रुपयाच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 340 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)