टाटा समूहाच्या नफ्यावर होणार परिणाम 

मुंबई –दूरसंचार क्षेत्रातून काढता पाय घेऊ पाहणाऱ्या टाटा समूहाने या क्षेत्रातील उपकंपनीतील सर्व गुंतवणूक निर्लेखित (राईट ऑफ) केली आहे. तोट्यातील टाटा टेलिसर्व्हिसेसमधील 28,651 कोटी रुपये निर्लेखित करण्याचा निर्णय समूहाने घेतला आहे.

टाटा सन्सच्या या निर्णयामुळे समूहाचा 2017-18 मधील एकत्रित निव्वळ नफा 4,379 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. 2012 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिलहरी रद्द करण्याच्या निर्णयामध्ये टाटा टेलिसर्व्हिसेसच्या तीन परवान्यांचाही समावेश होता. उपकंपनीतून जपानी भागीदार एनटीटी डोकोमोने फेब्रुवारी 2017 मध्येच माघार घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)