जलसंकटाचा वित्तीय क्षेत्रावर परिणाम

कंपन्यांचे काम थंडावल्यास कर्ज वसुलीवर परिणाम शक्‍य

नवी दिल्ली – पाण्याच्या समस्येमुळे बॅंकामंध्ये नॉन परफॉर्मिंग असेट्‌सचे (एनपीए) संकट आणखीन वाढू शकते. अनेक कर्जदात्यांना जलसंपदेचे जोखीम असणाऱ्य़ा क्षेत्रांमध्ये कर्जाचे वाटप केल्याने ही स्थिती निर्माण होऊ शकते. एनपीएत वाढ होत असल्याने बॅंकिंग क्षेत्रावर मोठे दडपण आले आहे. जलसंकट बॅंकांच्या तणावपूर्ण ताळेबंदातील तरलतेत आणखीन घट करू शकतो असे वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)ने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. वन्यजीवांच्या रक्षणासाठी डब्ल्यूडब्ल्यूएफ ही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंडियन बॅंक्‍स असोसिएशनच्या (आयबीए) सहकार्याने प्रकाशित डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचा अहवाल छुपी जोखीम आणि अप्रकाशित संधी : जल आणि भारतीय बॅंकिंग क्षेत्रामध्ये पाण्याचे संकट बॅंकांसाठी कशाप्रकारे जोखीम निर्माण करते याचा उहापोह मांडण्यात आला आहे. जल जोखमीमुळे वीज आणि कृषी क्षेत्रातील साधनसंपत्ती निरुपयोगी ठरू शकते हे यात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही क्षेत्रांनाच भारतीय बॅंकांनी सर्वाधिक कर्जाचे वाटप केले आहे. तेथील कंपन्यांच्या कर्ज परतफेडीवर परिणाम होऊ शकतो.

अहवालानुसार भारतीय बॅंकांच्या एकूण कर्जाच्या सुमारे 40 टक्के हिस्सा पाण्याची जोखीम अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्य़ा क्षेत्रांमध्ये देण्यात आला आहे. भारतीय बॅंकांच्या एकूण कर्जाच्या 10 टक्के हिस्सा अगोदरच एनपीए ठरला आहे. कर्जदारांनी परतफेड न केल्याने बॅंकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या जोखमींमुळे बॅंकांमधील रोकडप्रवाह आणखीन प्रभावित होणार आहे. नीती आयोगाच्या निष्कर्षाचा दाखला देत देशात वर्तमान जलसंकट स्वतःच्या सर्वात गंभीर स्थितीत पोहोचल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)