‘पीएम मोदी’ चित्रपटाला नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया!!

बहुचर्चित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंत मोदींचा प्रवास दाखविण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्विटरवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना नेटकऱ्यांनी हा ट्रेलर पाहून नरेंद्र मोदी ते निवडणूक आयोगावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. नेटकऱ्यांनी ‘पीएम मोदी विवेकपेक्षा चांगले अभिनेते आहेत’ असे लिहिले आहे. तर काही नेटकऱ्यांनी  या ट्रेलरच्या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘चित्रपटाच्या नावावर काहीही. निवडणूक आयोगाला हे दिसत नाहीये का?’ असा सवाल एका युजरने केला आहे.


पीएम मोदी या चित्रपट विवेक ओबेरॉय मध्यवर्ती भूमिकेत आहे. विवेक ओबेरॉयसह बामन इराणी, मनोज जोशी, प्रशांत नारायण, राजेंद्र गुप्ता,जरीना वहाब आणि अंजन श्रीवास्तव मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेक ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. पीएम मोदी चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://youtu.be/X6sjQG6lp8s

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)