मी कमीचं बोलतो आणि जास्त काम करतो ; पार्थ पवारांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

पिंपरी चिंचवड – राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असून, नुकतीच पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच अन्य नेते देखील उपस्थित होते. या वेळी सर्वांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भाषणाकडे होते. मात्र, त्यांचे भाषण अगदीच लहान, अडखळत व प्रभावी नसल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

यावर पार्थ पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून मी कमीचं बोलतो आणि जास्त काम करतो, असे म्हटले आहे. वडगाव येथे पत्रकारांसोबत बोलत असताना पार्थ पवार म्हणाले, “माझ्या भाषणात एक-दोन चुका झाल्या. माझं पहिलं भाषण होतं, पण याचा अर्थ असा नव्हे की मी फक्त भाषणावरचं लक्ष केंद्रित करावे, बरेच जण चांगली भाषणं करतात, परंतु कामं करत नाहीत. त्यामुळे मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)