त्रिशंकू भागासह उपनगरातील पाणी समस्या तातडीने सोडवा

आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे सातारा शहरालगतचा त्रिशंकू भाग आणि उपनगरांना भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जलवाहिन्यांना लागलेली गळती हा तर कधीही न सुटणारा प्रश्‍न बनला आहे. याशिवाय चुकीचे मीटर रिडींग, नवीन नळकनेक्‍शनसाठी घेतले जाणारे डिपॉझिट, थकीत बिलावरील विलंब आकार अशा अनेक कारणांमुळे नागरिक मेटाकुटीस आले आहे.

त्रिशंकू भाग आणि उपनगरातील पाणी समस्या तातडीने सोडवावी आणि इतर चुकीचे व बेकायदेशीर प्रकार तातडीने थांबवावेत, हे प्रकार त्वरीत न थांबल्यास प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिल्या. पाणी समस्या दूर करण्याबरोबरच इतर चुकीचे प्रकार तातडीने थांबवले जातील असे आश्‍वासन प्राधिकरणाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता भुजबळ यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, करंजे, सदरबझार आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पिण्यासही पाणी मिळत नाही. तसेच ठिकठिकाणी जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून वारंवार लेखी, तोंडी सांगूनही गळती काढण्याचे काम केले जात नाही. थकित पाणी बिलांवर चुकीच्या पध्दतीने विलंब आकार लावण्यात आला आहे. हा आकार अन्यायकारक असून सदर आकारणी त्वरीत रद्द करण्यात यावी. शासन निर्णय दि. 9 जुलै 2014 नुसार लोकवर्गणी माफ करण्यात आली असताना गोडोली, गोळीबार मैदान, विलासपूर आदी भागात नळ कनेक्‍शन जोडणीसाठी लोकवर्गणीच्या नावे 5 हजार रुपये घेतले जातात. मीटर रिडींग चुकीचे येत असल्याबाबत असंख्य तक्रारी दाखल होत आहेत. नागरिकांना हेलपाटे मारणे भाग पडत आहे.

प्राधिकरणाने केलेली पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असून ही दरवाढ तातडीने रद्द करावी. नवीन नळकनेक्‍शन जोडणेसाठी नागरिकांकडून चुकीच्यापध्दतीने डिपॉझीटच्या नावाखाली 20 हजार ते 25 हजार अशी कितीही रक्‍कम बेकायदेशररित्या घेतली जात असून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. शाहूपुरी भागात अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करुन सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे. विसावा ते कोटेश्‍वर टाकीपर्यंत मुख्य दाब नलीकेवर अनेक नळकनेक्‍नश दिली गेली आहेत. त्यामुळे शाहूपूरी भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)