महाळुंगे इंगळे – खराबवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच जीवन मोहन खराबी यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे दिला आहे. जीवन खराबी यांचा सरपंच पदाचा नियोजित कालावधीत पूर्ण झाल्याने इतरांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी, म्हणून त्यांनी स्वखुशीने या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रावर काजल शेडगे व रुपाली खराबी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जीवन खराबी यांनी सरपंच पदाच्या कालावधीत गावातील विकास कामांना जास्त प्राधान्य दिले आहे.