पतधोरणावर विकसकांची नापसंती 

किफायतशीर घरांच्या विक्रीवरही परिणाम शक्‍य 
मुंबई: नव्या घराचीनिर्मिती थांबली आहे. न विकल्या गेलेल्या घराची विक्री दर कमी होऊनही होत नाही. अशा अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यात दुसऱ्या वेळी व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे रिऍल्टी क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे विकसकांनी सांगितले आहे.
नॅरडेको या संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की यामुळे ग्राहक खरेदी करण्यास धजावणार नाहीत. व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर तर परिणम होणार आहेच त्याचबरोबर विकसकांनाही भांडवल महागात मिळणार आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष जॅक्‍सी शाह यांनी सांगितले की, एकीकडे सरकार सर्वाना घरे देण्याची भाषा करीत आहे. तर दुसरीकडे व्याजदरात पुनःपुन्हा वाढ होत आहे. त्याचबरोबर सरकारने घरासाठीचा जीएसटी शक्‍य तितक्‍या लवकर 8 टक्‍क्‍यापर्यंत कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.
डीएलएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव तलवार यानी सांगितले की प्रदिर्घ मंदीतून रिऍल्टी क्षेत्र बाहेर येण्यासाठी धडपडत असतानाच व्याजदरात दोन महिन्यात अर्धा टक्‍क्‍यानी वाढ झाली आहे. या व्याजदर वाढीचा फक्त घराच्या निर्मितीवर आणि विक्रीवर परिणाम होणार नाही तर ग्राहक वस्तू क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मागणी नसल्यामुळे अनेक वर्षापासून रिऍल्टी क्षेत्र पिछाडीवर आहे.आताच्या व्याजदर वाढीमुळे या क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
परवडणाऱ्या घरावरही याचा परिणाम होणार असल्याचे त्यानी सांगितले.नाईट फ्रॅंकचे मुख्य कार्यकारी अधिकार शिशिर बैजल म्हणाले की, यावेळी रिझर्व्ह बॅंक व्याजदर जैसे थे ठेवण्याची अपेक्षा होती. ऍनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यानी सांगितले की, या निर्णयाचा रिऍल्टी क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही. कारण आता नवे प्रकल्प वेगाने आकाराला येऊ लागले आहेत. त्याचबरोबर बहुतांश घराचे व्याजदर फ्लोटिंग स्वरूपाचे असतात त्यामुळे नंतर व्याजदर कमी झाल्यास त्याचा घरासाठी कर्ज घेणाऱ्या लाभ मिळण्याची शक्‍यता खुुली असते. जेएलएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यानी सांगितले की, कमी किमतीची घरे घेणाऱ्यावर या निर्णयाचा परिणाम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)