रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी 2018-19च्या चौथ्या द्वि-मासिक धोरणाचा आढावा घेत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट :,”जैसे थे’च ठेवल्याने रिझर्व्ह बॅंकेने साऱ्यांनाच धक्‍का दिला आहे.
रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्‍के आहे. तर महागाईचा दर हा चार टक्‍केच राहिला आहे.

महागाईचा दर अपेक्षेप्रमाणे स्थिर राहिल्याने रिझर्व्ह बॅंकेचा विश्वास वाढला. रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षातील वृद्धीदर 7.4 टक्‍के राहण्याची शक्‍यता वर्तवली आहे, तसेच हा वृद्धीदर 2019-20 वर्षांत 7.6 टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयने रेपो रेट न वाढवल्यामुळे कर्जदारांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जाचा हप्ता आता जैसे थेच राहणार आहे.

-Ads-

रेपो दरात बदल न करताना कठोर आर्थिक निर्णय भविष्यात घेतले जातील, अशी भूमिका बॅंकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी मांडली. याचा अर्थ येत्या काळात दर वाढतील किंवा तेवढेच राहतील, पण कमी होण्याची शक्‍यता नाही.
महागाई दर कुठल्याही स्थितीत 4 टक्‍क्‍यांच्या वर जाणार नाही, यासाठी कटिबद्ध असल्याची पटेल यांची ग्वाही दिली.
बॅंकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक देशातल्या बॅंकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, त्याल रेपो रेट म्हणतात.

रिझर्व्ह बॅंकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बॅंका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बॅंकांचं कर्जही महाग होते आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो. बॅंकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बॅंका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बॅंक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बॅंक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बॅंका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)