राज्यांची तूटही वाढू लागली 

एकीकडे कर्जमाफी तर दुसरीकडे जीएसटीमुळे महसूल कमी 
आर्थिक शिस्त बाळगण्याचा रिझर्व्ह बॅंकेची सूचना 
मुंबई: औद्योगिक उत्पादन कमी झाले असतानाच रिझर्व्ह बॅंकेने राज्यांची वित्तीय तूट आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. बॅंकेने राज्य सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. एकीकडे पगारावरील खर्च वाढत आहे तर दुसरीकडे जीएसटीमधून महसूल कमी झाला आहे. यामुळे राज्यांची वित्तीय तूट आणखी 0.35 टक्‍क्‍यांनी वाढून 3.1 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची तूटही 3.3 टक्‍के होणार आहे. त्यामुळे एकंदरीत तूट वाढून त्याचा महागाईवर परिणाम संभवतो, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने दिला आहे. 
गेल्या तीन वर्षांपासून राज्यांची तूट ठरविल्यापेक्षा जास्त होण्याचा प्रकार घडत आहे. केंद्र सरकारने राज्यांना आपल्या उत्पन्नातील बराच वाटा दिला असूनही राज्यांचा खर्च वाढत आहे. त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात कर्जमाफी केली जात असल्यामुळे राज्यांचे ताळेबंद बिघडत चालले आहेत. कर्जमाफीमुळे राज्यांच्या एकूण तुटीवर 0.13 टक्‍क्‍यांचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर कर्ज परत करण्याच्या संस्कृतीवर आघात होत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि कर्नाटकने याअगोदर कर्जमाफीच्या घोषणा केल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने कर्जमाफीवर नापसंती व्यक्‍त करूनही निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्‍यता या अगोदर विश्‍लेषकांनी व्यक्‍त केली आहे. 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)