रिझर्व्ह बॅकेसंबंधात सरकारकडून विविध पर्यायांवर विचार सुरू ?

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंक आणि मोदी सरकारमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, असा कयास बांधला जात आहे.

आरबीआयच्या संचालक मंडळाची 19 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. आरबीआयला मिळालेल्या तीन लाख कोटींच्या लाभांशामध्ये सरकारला सहभागी करवून घेण्याचा अर्थमंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. मात्र, अर्थमंत्रालयाने त्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र, बॅंकेच्या भांडवली धोरणावर चर्चा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

रिझर्व्ह बॅंकेचे पूर्ण वेळ सदस्य नसलेल्या काहींनी वादग्रस्त विधाने केली असली तरी उर्जित पटेल यांनी मौन पाळले आहे. सरकारने ऊर्जा आणि लघु उद्योगाला कर्ज देण्यासाठी नियम शिथिल करण्याची मागणी सरकारने चालविली आहे. दुसरीकडे पटेल हे काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

देशाच्या अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती माहिती नसलेल्या अर्थतज्ज्ञांमुळे अडचणीत भरच पडल्याचे सरकारला वाटते. यापूर्वीचे रघुराम राजन असो की उर्जित पटेल असो परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळेच आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून महसूल विभागातील नोकरशहाची नियुक्ती केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)