रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देण्याच्या तयारीत? 

सरकारने आरबीआय कायद्यातील कलम 7 चा वापर केल्याने नाराजी 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आरबीआय कायद्यातील कलम 7 चा वापर करून आपले काही निर्णय रिझर्व्ह बॅंकेला मान्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असे वृत्त काही अर्थविषयक वृत्तवाहिन्यांनी दिल्याने खळबळ माजली आहे. सरकारने याविषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने नुकतेच आरबीआयला पत्र पाठवून कलम सात अंतर्गत काही विषयांवरील माहिती मागवत त्यांना काही सुचना केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने परिस्थिती खालावलेल्या बॅंकांच्या भांडवालाची गरज, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा इत्यादी विषयांचा समावेश आहे. सध्याच्या रचनेनुसार रिझर्व्ह बॅंक ही पुर्ण स्वायत्त संस्था आहे त्यांच्या निर्णयावर सरकारचे बंधन नसते. तथापी आरबीआय कायद्याच्या कलम 7 मध्ये सरकारला आपले काही निर्णय आरबीआयला मान्य करण्यास भाग पाडण्याचा अधिकार आहे. त्याचाच वापर सरकारने केल्याने रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर नाखूष आहेत असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतर आजतागयात कलम सातचा कोणत्याच सरकारने वापर केला नव्हता. त्यामुळे ही अभुतपुर्व स्थिती उद्‌भवली आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता धोक्‍यात आणून आपले काही निर्णय त्यांनी मनमानी पद्धतीने या बॅंकेवर लादण्याचा प्रयत्न चालवला आहे असा जाहीर आरोप रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर सरकार आणि आरबीआय यांच्यातील संघर्षाने उग्र स्वरूप धारण केल्याची बाब समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)