आर्थिक मागासांसाठीचे आरक्षण भाजपवरच उलटेल : तेजस्वी यादव

नवी दिल्ली: मोदी सरकारने आर्थिक मागासांसाठी दहा टक्के आरक्षणाचे गाजर दाखवले आहे हा निर्णय भाजपवरच उलटण्याची शक्‍यता आहे असे प्रतिपादन राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना त्यामुळे देशातील बहुजनांमध्ये झाली आहे त्याचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही.

आरक्षण हा गरीबी हटाओचा कार्यक्रम नाही असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने अत्यंत घिसाडघाईने हा निर्णय अंमलात आणला असून त्याची गत नोटबंदीच्या घिसाडघाईसारखीच झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण न करता आणि कोणताही आयोग न नेमता मोदींनी या आरक्षणासाठी घटना दुरूस्ती केली आहे. अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण देशात लागू करायचे असेल तर त्याला कागदोपत्री सबळ कारण लागते, सर्व्हे करावा लागतो, संबंधीत आयोगाची शिफारस लागते. या दहा टक्के आरक्षणासाठी असा कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरक्षणासाठी असलेली 50 टक्‍क्‍यांची मर्यादा मोदी सरकारने ओलांडून अनेक समस्यांचा पेटारा उघडला आहे अशी टिप्पणीही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असेही ते म्हणाले. बहुजन समाजातील अनेक गरीबांना केवळ 50 टक्कक्‍यांच्या मर्यादेचे कारण देऊन त्यांना आरक्षण नाकारण्यात आले आहे त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे अशी त्यांची भावना निर्माण झाली आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)