आर्थिक मागासांसाठीचे आरक्षण म्हणजे निवडणुकांपूर्वीचे गाजर : काँग्रेस  

नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आनंद शर्मा यांनी, ‘केंद्रातील भाजप सरकारकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास घटकांसाठी देण्यात आलेले १०% आरक्षण म्हणजे भाजप सरकारकडून निवडणुकांपूर्वी जनतेला दिले गेलेले गाजर आहे.’ असा आरोप केला.

काँग्रेसह अन्य विरोधी पक्षांनी देखील सरकारकडून सादर करण्यात आलेल्या १२४व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या ‘वेळेवरून’ प्रश्न उपस्थित करताना सरकारने लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना हा निर्णय का जाहीर केला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत, “भाजप सरकारला माहित आहे की लवकरच आचार संहिता लागू होणार आहे त्यामुळेच भाजपने हे विधेयक मांडण्यासाठी एवढी घाई लावली आहे. हे विधेयक सादर करून सरकार देशातील जनतेला पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’चे आभासी स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)