नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आहे. तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा समाजाला राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या आरक्षणाला वैध ठरवले होते. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. मात्र यावेळी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आपण मराठा आरक्षणाच्या निर्णययावर स्थगिती आणणारी याचिका जरी फेटाळली असली तरी मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार असल्याचे म्हंटले आहे.
युथ फॉर इक्वॅलिटी या स्वयंसेवी संस्थाच्यावतीने संजीत शुक्ला यांनी मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर स्थगिती आणावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामुळे आरक्षणासाठीची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे असा याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप होता. या निर्णयाला आव्हान दिले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनेही त्यावर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या याचिकेवर निर्णय घेऊ नये अशी मागणी त्यात राज्य सरकारने केली होती.
Maratha Reservation case: Supreme Court refuses to stay Maratha reservation, However, SC said, ‘we will hear the appeal for quashing of reservation for Maratha for admission in educational institution and government jobs’ pic.twitter.com/215aECKFyk
— ANI (@ANI) July 12, 2019