आरक्षणाला 50 टक्के ही मर्यादा नाही ; उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा दावा

मराठा आरक्षण: उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा दावा

मुंबई: आरक्षणाला 50 टक्‍के ही काही मर्यादा नाही. असे कोठेही नमुद केलेले नसल्याने 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकते. असे आरक्षण घटनाबाह्य नाही, असा दावा मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकिल ऍड. रफीक दाद यांनी आज उच्च न्यायालयात केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थ अभिजित कदम यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ऍड. रफीक दाद यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिवकाकर्त्यांचे मुद्दे खोडून काढले.

आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा कोठेही घालण्यात आलेली नाही. त्यापेक्षा आरक्षण कोटा जास्त झाला तर ते आरक्षण घटनाबाह्य होत नाही, असा दावा केला. घटनेच्या 103 कलमानुसार शैक्षणिक क्षेत्रात मागास असलेल्यांना स्वतंत्र 10 टेक्‍क आरक्षण देण्याची तरतुद करण्यात आली आहे. तशी तरतुद केल्यानंतर 50 टक्केची मर्यादा ओलांडली असल्याने 103 कलमनुसार देण्यात आलेले आरक्षण बेकायदा ठरत नाही. 50 टक्के ही मर्यादा निश्‍चित केली असली तरी ती पार केल्यानंतर घटनेला धक्का बसत नाही, असा दावा करून राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे समर्थन केले.

तसेच घटना दुरूस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राष्ट्रपतींना दिले असले तरी राज्याच्या अधिकार काढून घेतलेले नाहीत. संविधानाच्या अनुच्छेदातील 15(2) आणि16(4) नुसार राज्य सरकारला विशेष अधिकार आहेत. एसीबीसी कायद्यानुसार राज्य सरकारला एखाद्या गटाला आर्थिक आणि शैक्षणीक क्षेत्रात आरक्षण देण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करताना राज्य सरकारने संबंधीत गटाचा सर्व्हेक्षण करून डाटा जमा केला. त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरक्षण देण्यासंबंधी घटनेने दिलेल्या अधिकारानुसार निर्णय घेतलने तो निर्णय बेकायदा ठरू शकत नाही, असा दावा केला. आज सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती उद्या शुक्रवार दि. 15 मार्चला ठेवण्यात आली आहे. यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ ऍड. प्रसाद ढाकेफाळके युक्तीवाद करणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)