शाहूपुरी – मार्च महिन्यापासूनच सातारा शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून एप्रिलच्या सुरुवातीपासून पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल केली होती. मात्र गत आठवड्यात दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही भागाला झोडपून काढल्यानंतर वातावरणात दोन दिवस गारवा होता. मात्र पुन्हा उन्हाचा पारा वाढू लागला असतानाच मंगळवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आकाशात गोळा झालेले हे काळे ढग पुन्हा अवकाळीचेच संकेत देत होते. मंगळवारी सकाळी शाहूपुरी भागातून टिपलेले ढगाळ वातावरणाचे हे छायाचित्र.