मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाची घोषणा लांबणीवर ?

कोलकाता: निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांतील निवडणूकांचा कार्यक्रम आज पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार असल्याची बातमी सकाळीच प्रसृत झाली होती. आयोगाने दुपारी साडे बारा वाजता पत्रकार परिषद ठेवली होती.ती वेळ आयत्यावेळी बदलून दुपारी 3 अशी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी 1 वाजता अजमेरला जाहीरसभा होणार असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा लांबणीवर टाकली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग स्वायत्त आहे काय असा सवालही कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी उपस्थित केला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आज निवडणूक आयोगाद्वारे पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ही पत्रकार परिषद निवोजीत वेळेवर होऊ शकली नाही.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची अचानक बदलेली वेळ आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून  काँग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याप्रकरणावर आक्षेप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच सदर पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ट्विटर द्वारे आपली भूमिका मांडताना सुरजेवाल यांनी म्हंटले आहे आहे की “निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १२.३० ला होणार होती, तसेच पंतप्रधानांची सभा आज अजमेर येथे १ वाजता होती त्यामुळेच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचा वेळ अचानक बदलून दुपारी ३ वाजताची केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)