मतदान केंद्रांवरील आवश्‍यक सुविधा (भाग-१)

निवडणूक आयोग यांनी त्यांच्याकडील पत्र क्रमांक 464/INST/2019/EPS दिनांक 16.3.2019 अन्वये मतदानाच्यां वेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर आश्वासित किमान सुविधा Assured minimum facilities (MF) पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येकी मतदान केंद्रांवर त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

निवडणूक आयोग यांच्या इंग्रजी भाषेत असलेल्या व उपरोक्त मूळ पत्राचा मराठी भाषेत मतितार्थ खालीलप्रमाणे:-
निवडणूक आयोगाने पुनर्विचार करून असे
निर्देशित केले आहे की, सर्व जिल्ह्यात निवडणूक अधिकारी (DEO’s) यांच्या मार्फत मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर आश्वासित किमान सुविधा (Assured minimum facilities (MF)) पुरविण्यात याव्यात. या किमान मुलभूत सुविधा खालीलप्रमाणे आहेत.

1. रॅम्पसाठी (Ramp) तरतूद – माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार, पीडब्ल्यूडी (शारीरिकदृष्ट्या निसमर्थ) मतदारांसाठी मतदान केंद्रावर 1:10 किंवा त्यापेक्षा कमी उतार (Slop) असलेल्या रॅम्पची सुविधा असावी. मतदान केंद्रात कायमस्वरूपी रॅम्प उपलब्ध नसल्यास, तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

2. पिण्याच्या पाण्याची तरतूद – प्रत्येक मतदान केंद्रावर योग्य पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. 3ि00 लिटर पिण्याच्या पाण्याचे भांडे, एकदा उपयोगी ग्लाससह (With disposal glasses).

जर पिण्याच्या (पाण्याची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध नसेल तर मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याचा साठा करण्याची पर्याप्त सोय उपलब्ध करून देण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी भरण्यासाठी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना पाणी देण्यासाठी मतदान केंद्रावर एक कर्मचारी नियुक्त करावा किंवा रोजंदारीवर या कामासाठी कर्मचारी नियुक्त करावा.

3. पुरेसे फर्निचर (depute Furniture) – मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी पुरेशा प्रमाणात टेबल, खुर्च्या आणि बेंच यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी योग्य तरतूद असणे आवश्‍यक आहे.

4. वैद्यकीय किट (medical kit) – याची खात्री करावी की, प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय किट असेल ज्यात, पॅरासिटॅमॉल औषधासह व गॉझ पॅड (44 इंच), 1 मोठे गॉझ पॅड, चिकट पट्टी, रोलिंग पट्टी, ओआरएस / त्रिकोणीय पट्ट्या / जखमेची स्वच्छता करणारे द्रव्य, रबरी हातमोजे, कात्री इत्यादी. साहित्य असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर, मतदाराच्या आपत्कालीन वापरासाठी एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध करून देण्यात यावा.

5. योग्य प्रकाशाची / विजेची व्यवस्था – मतदान कक्षाच्या आतील भागात पुरेसा प्रकाश असल्याचे सुनिश्चित करावे. आवश्‍यक असल्यास, प्रत्येक कक्षासाठी योग्य प्रकाशासाठी व्यवस्था करण्यात यावी. तथापि, मतदान कक्षाच्या/थेट वर किंवा थेट समोर हॅलोजन दिवे किंवा 200 वॅटचे बल्ब लावणे टाळण्यात यावे. मतदान केंद्रावर विजेची योग्य व्यवस्था करावी. जर वीज जोडणी उपलब्ध असेल तर, विजेची बटनदिवे, पंखे तपासून घेण्यात यावे जर वीज जोडणी उपलब्ध नसेल तर, जॅनरेटर संच भाड्याने घेण्यात येऊन पर्यायी व्यवस्था कर्यालत यावी ज्यायोगे मतदान केंद्रात पुरेसा उजेड असेल.

मतदान केंद्रांवरील आवश्‍यक सुविधा (भाग-२)

6. मदत कक्ष – बहुविध मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रात, मतदारांना मदत प्रदान करण्याच्या हेतूने एक मदत कक्ष स्थॉपन करण्यात यावा. या मदत कक्षाचा उद्देश मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र दाखविणे आणि मतदार चिठ्ठी जारी करणे हा असावा. मदत कक्ष हा दर्शनी भागात स्थापन करावा जो मतदारांना सहज दिसेल आणि त्यांना तिथे पोहोचता येईल. या मदत कक्षात बूथ लेव्हल ऑफिसरची नेमणूक करण्यात यावी ज्याच्याजवळ वर्णानुक्रमानुसार असलेली मतदार यादीअसेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)