कचरा डेपो हटवण्यासाठी शिवसेनेचे नगरपंचायतीला निवेदन

लोणंद बाजारतळावरील कचरा डेपो हटवण्याची नागरिकांची मागणी

लोणंद – बाजारतळ येथील कचरा डेपो हटविण्यात यावा यासासाठी लोणंद नगरपंचायचे कार्यालय अधीक्षक शंकरराव शेळके यांना लोणंद शहर शिवसेना यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की लोणंद येथील बाजारतळ परिसरातील कचरा डेपोचा कोणताही ठराव न करता आपण तेथे कचरा डेपो केला आहे. त्याचा नाहक त्रास तेथील नागरिकांना होत आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट व दुर्गंधी पसरत असून नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागला आहे. पाच दिवसांच्या आत योग्य ती उपाययोजना करुन कचरा डेपो त्वरीत त्या ठिकाणाहून योग्य त्या ठिकाणी हलवावा अन्यथा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू दिला जाणार नाही.

प्लास्टीक बंदीबाबत नगरपंचायतीकडून कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतही निवेदनात माहिती विचारली असून उपाययोजना न केल्यास तो कचरा नगरपंचायत पटांगणात आणून टाकू असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख संदीप शेळके, युवासेना शहर प्रमुख शंभुराज भोसले, उप शहर प्रमुख अविनाश नलवडे, उपशहर प्रमुख व वाहतुक सेना सल्लागार हेमंत पवार, वाहतूक सेना शहर प्रमुख जगन्नाथ येळे, चंदकांत बुरूगले व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)