आरपीआय ‘युती’ सोबतचच! शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी एक जागा सोडण्याची मागणी : आठवले

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज एका वृत्तसंस्थेशी बोलताना, आपला पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आठवले यांचा पक्ष युतीमध्ये सामील होणार असला तरी त्यांची शिवसेना आणि भाजपने आरपीआयसाठी मुंबईमध्ये एक आणि मुंबईबाहेर एक अशा दोन जागा सोडाव्या अशी मागणी कायम ठेवली आहे.

तत्पूर्वी, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम दोन्ही पक्षांमधील पक्षश्रेष्ठींनी दूर केला असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप २५ तर शिवसेना २३ जागांवर उमेदवार उभा करणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या युतीच्या निर्णयामध्ये मित्रपक्षांना जागा देणार की नाही यावर कोणतीही भूमिका शिवसेना-भाजपकडून मांडली न गेल्याने युतीतील मित्रपक्ष सध्या संभ्रमामध्ये आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1099982873753501696

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)