रिपब्लिकन पक्षाची शनिवारी नियोजन बैठक 

11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ना. आठवले यांच्या दौऱ्याची तयारी

नगर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची बैठक शनिवारी रोजी सकाळी 12 वा शासकीय विश्रामगृह येथे आयेजित करण्यात आली आहे. या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.

11 सप्टेबर रोजी नगर शरहामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित होणाऱ्या महामेळावा संदर्भात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अमित काळे यांनी दिली.

या बैठकीस आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाघचौरे, राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे, पवन साळवे, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, संजय कांबळे, बाळासाहेब गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजस साळवे,जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, रामचंद्र कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, यूवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, युवक शहर जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, यूवकचे भिंगार शहाराध्यक्ष अमित काळे, पापाभाई बिवाल, बाळासाहेब गायकवाड, विजयकांत चाबूकस्वार,  मिलिंद शिंदे, दिपक गायकवाड, दिपक लोंढे, पवन भिंगारदिवे, नंदु कानडे, संदिप वाघचौरे, सचिन छजलाने, संतोष सारसर, प्रविण वाघमारे, आरती बडेकर, शालिनी पंडित आदि उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)