‘हे’ असणार प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे ; ९० मिनिटे चालेल परेड

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी दक्षिण अफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी सकाळी सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट जवळ अमर जवान ज्योती वर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करतील.

प्रजासत्ताक दिन आपण भारतात मोट्या प्रमाणात साजरा करतो. यावर्षी प्रजासत्ताक दिनी ९० मिनिटे परेड चालणार आहे. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारतातील विभिन्न राज्याची संस्कृती पाहायला मिळणार आहे. तसेच ऐतिहासिक आणि विकासावर आधारित काही देखावे आणि लोक नृत्य असणार. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेता २६ विद्यार्थ्यांना देखाव्याचा हिस्सा बनवल्या जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण अफ्रीकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी डॉ. शेपो मोसेपे आणि नऊ मंत्री तसेच उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि ५० सदस्यांचे व्यवसायिक प्रतिनिधीमंडळ देखील असणार आहे. नेल्सन मंडेला नंतर हे दक्षिण अफ्रीकेचे दुसरे पंतप्रधान आहेत जे भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)