पुणे: गांधी जयंतीच्या अनुषंगाने बॅंक ऑफ महाराष्ट्राने स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मोहीम राबवली. हा पुढाकार बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालांसह 1846 शाखांमार्फत घेतला गेला. पुणे शहर आणि पुणे पूर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी बालगंधर्व रंग मंदिर आणि संभाजी उद्यान परिसराची स्वच्छता केली. यासह कर्मचाऱ्यांनी बॅंकेच्या शिवाजीनगर पुणे स्थित मुख्य कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. याचे औचित्य साधून बॅंकेच्या विविध ग्रामीण शाखांमध्ये श्रमदान केले गेले आणि ग्रामस्थांना कचरा संकलनासाठी पेट्या दिल्या गेल्या.
2 ऑक्टोबर रोजी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले गेले. यावेळी बोलताना राऊत म्हणाले स्वच्छ भारत अभियानाचा खरा हेतू साकारण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र वचनबद्ध असून स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी आपले अंशदान देत आहे. देशाला स्वच्छ करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी दिनांक 2 ऑक्टोबर 2014 रोजी आपल्या देशाच्या पंतप्रधानांद्वारे गांधी जयंतीच्या अनुषंगाने प्रारंभ करण्यात आलेल्या स्वच्छ भारत या प्रमुख अभियानाचे हे चौथे वर्ष आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0