निरव मोदी घोटाळा इतिहासजमा!

चालू आर्थिक वर्षाअखेर पीएनबीला होणार नफा 
बॅंकेच्या खराब कर्जाच्या रकमेत होऊ लागली घट 
कर्मचाऱ्यांनी एकदिलाने काम केल्यामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची कर्जवसूली वाढू लागली आहे. ठरवून कर्ज बुडविणाऱ्यांच्या संख्येत आणि रकमेत घट होत आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंकेचा ताळेबंद सुधारणार आहे. वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत बॅंकेला नफा होण्याची शक्‍यता आहे. निरव मोदी घोटाळा आता इतिहासजमा झाला आहे. तसेच असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. 
– सुनील मेहता, व्यवस्थापकीय संचालक, पंजाब नॅशनल बॅंक 
थिरुवअनंतपूरम: या आर्थिक वर्षात पंजाब नॅशनल बॅंकेला नफा सुरू होणार आहे. निरव मोदी घोटाळ्यातून बॅंक आता पूर्णपणे बाहेर आली आहे. आता पंजाब नॅशनल बॅंकेचा प्रगतीचा काळ सुरू झाला असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जानेवारी महिन्यात निरव मोदी प्रकरण बाहेर आल्यानंतर या बॅंकेच्या काभारवर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर बॅंकेच्या नेतृत्वातही बदल करण्यता आला होता. कर्ज वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात वाढविण्यता आली होती. त्या माहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता बॅंकेने बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
ते म्हणाले की, अशा प्रकारचा धक्‍का पचविण्याची बॅंकेची क्षमता होती, हे बॅंकेने सिद्ध केले आहे. आता पुढील वाटचाल चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेतर्फे केरळला 5 कोटी रुपयांची मदत दिल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, बॅंकेचा कर्ज पुरवठा वाढू लागला आहे. इतर बॅंकांपेक्षा पंजाब नॅशनल बॅंकेने अधिक कर्जपुरवठा केला असल्याचे त्यांनी सांगितले. जून अखेरच्या तिमाहीत बॅंकेला 940 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बॅंकेला आता सरकार 5431 कोटी रुपयांची भांडवली मदत करणार आहे. निरव मोदी आणि मेहूल चोक्‍सी यांनी बॅंकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यांची चौकशी चालू आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)