सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनात वाढ 

नवी दिल्ली: जीएसटी भरणा करण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असून हा आकडा 94 हजार 442 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये 93,690 कोटी रुपयांचा जीएसटी जमा करण्यात आला असल्याची नोंद अर्थमंत्रालयाकडून सादर केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये 67 लाख जीएसटी रिटर्न फाईल जमा करण्यात आल्या आहेत.
एकूण केंद्रीय पातळीवर जमा करण्यात आलेला जीएसटी कर 15,318 कोटी रुपये इतका आहे. तर राज्य जीएसटी 50,070 कोटी इतका कर जमा झाला आहे. एकूण आयात करण्यात आलेल्या व्यापारामधून 25,308 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. अर्थमंत्रालयाकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून सप्टेंबर 2018 मध्ये सीजीएसटीचा भरणा 30,574 कोटी रुपये करण्यात आला असल्याचे चित्र दिसून आले. तर दुसरीकडे एसजीएसटी मार्फत 35,015 कोटी रुपयांचा भरणा कराच्या रूपाने सरकारी तिजोऱीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)