मुरूम त्वचा रोगच 

डॉ. राजेंद्र माने 
बऱ्याचदा मुरुमांचा त्रास वयात येण्याच्या काळात होतो, तसा तो वयाच्या 20 व्या किंवा 30 व्या वर्षातही होऊ शकतो. खुले किंवा बंद फोड, पूयुक्त फुगीर भाग, त्वचेचा वर आलेला लालसर भाग, सर्वसाधारणतः चेहरा, पाठ आणि छातीवर व्रण पडण्याची प्रक्रिया ठराविक कालावधीत होते. 
लक्षणे 
वेदना, जखमा होणे, आणि खाज येऊ शकते.
पाळी येण्यापूर्वी अधिक तीव्र होऊ शकते
पुरुषांमधे मुरुमे येण्याचे प्रमाण तीव्र राहते, आणि स्त्रियांपेक्षा उशिरा सुरुवात होते.
कारणे 
याचे खरे कारण बऱ्याचदा माहिती नसते. काही प्रकरणी अँड्रोजेन्स (संप्रेरक) हे घडवून आणतात. केराटीन नांवाच्या प्रथिनामुळं केसांची मुळं बंद झाल्यानं तथाकथित पांढरे ठिपके आणि काळे ठिपके निर्माण होतात. केसांच्या मुळात स्थित बंदीस्त सेबॅशियस ग्रंथी सीबमचे (एक तेलकट द्राव) स्त्रवण चालूच ठेवतात. हे सीबम आणि त्वचेच्या पेशी बाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळं केसाचं मूळ फुगीर बनतं. हा फुगीरपणा चालूच राहिल्यास ते फुटते, परिणामी पृष्ठभागावरील विषाणू (हे सामान्यतः त्वचेवर आढळतात) आंत शिरतात आणि स्थानीक संक्रमण करवतात (पिटीका), मग ते मोठे होतात आणि पुटी तयार होते.
त्वचेला त्रासदायक क्रीम्स्‌ आणि तेले
ठराविक औषधे घेणे
सातत्यानं त्वचेचं घर्षण (उदा., दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे, टेलीफोनचा वापर)
साधे उपाय
मुरुमांच्या व्रणांना हात लावून संक्रमण होऊ देऊ नका
आपला चेहरा स्वच्छ ठेवा
सौंदर्य प्रसाधनं वापरताना काळजी घ्या
आणखी काय कराल? 
सकाळी चेहरा स्वच्छ धुवून पातळ क्‍लेंझर लावावे. नंतर परत पाण्याने धुवून मऊ रुमालाने टिपावे. कापूस अस्टींजंटमध्ये भिजवून चेह-याला लावावे. तेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल. मुरुमावर औषधी क्रीम लावावे. लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे. दुपारी परत चेहरा साध्या पाण्याने धुवून अस्ट्रींजंट लावून मग क्रीम लावावे. रात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुवून क्‍लेंझर, अस्ट्रींजंट लावावे. मग क्‍लीअरसिलसारखे औषध लावावे.
मॉइश्‍चरायजरही लावता येईल. मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी.
मुरुमांना खूप हाताळू नये.
ऑईल बेस क्रीम लावू नये.
खूप तळण वगैरे तळू नये, कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही.
ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा.
चेहऱ्याच्या सुंदर त्वचेसाठी 
कोरफड आणि हळद दोन्ही जंतूनाशक, दाहशामक असल्याने नैसर्गिकरित्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे कोरफड व हळदीचा एकत्र फेसपॅक बनवून चेह-यावर लावल्यास त्वचेची कांती सुधारते व मुरुमं, पुटपुळ्या अशा समस्या कमी होण्यास मदत होते. हा पॅक एक टेबलस्पून हळदीमध्ये मध, दूध व काही थेंब गुलाबपाणी टाकून मिश्रण एकत्र करावे. या मिश्रणात थोडा कोरफडीचा गर टाकून फेसपॅक तयार करा. आता चेह-यावरील मुरुमे असलेल्या भागावर फेसपॅक लावा. 15 मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्याच प्रमाणे टोमॅटोचा फेसपॅक अर्धा टोमॅटो कापून त्याचा रस काढा. रसातील आम्लता थोडी कमी करण्यासाठी, त्यात पाणी घाला.रात्रभर हा रस चेह-यावर लावून, दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)