“देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या नावाच्या चर्चेच कारण म्हणजे तिने भारताची पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निक जोनासबरोबर लग्न झाल्यापासून प्रियांका फार कमी वेळ भारतात असते. बॉलिवूड, हॉलिवूड आणि फिल्म प्रॉडक्शनच्या कामात प्रचंड व्यस्त असलेल्या प्रियांकाला आता राजकारणात रस निर्माण झाला आहे.
आपल्याला एक दिवस देशाचे पंतप्रधानपद बनायची महत्वाकांक्षा तिने बोलून दाखवली आहे. प्रियांका म्हणाली, एका दिवस मला भारताची प्रधानमंत्री व्हायचे आहे. तसेच मला वाटते माझे पती निक’ने सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवावी. मात्र निक’ला राजकारणात रस नसल्याचे प्रियांका म्हणाली.