लक्षात असू द्या, असा ‘फड’ रंगवणे बरे नाही- धनंजय मुंडे

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जमीन खरेदी व्यवहाराप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

तसेच जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या तोंडावर माझ्या विरुद्ध खोटे कारस्थान रचण्यात येते. पण लक्षात असू द्या, असा ‘फड’ रंगवणे बरे नाही! माझ्यावर कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकारविरुद्ध आवाज उठवणे मी थांबवणार नाही. माझा लढा सुरूच राहिल, असेही मुंडे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)